शुक्रवार, १५ जून, २०१८

"मराठा साम्राज्याची अस्मिता फुले पगडी आणी* 
           *मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड"*
                             - व्याख्याते वपत्रकार हर्षल बागल
            फुले पगडी असो की इतर महापुरषांच्या शाही पगडी असोत या काळाच्या पडद्याआड होत चालल्या होत्या याला प्रकाशात आणुन महाराष्ट्राच्या विचारपिठावर जिवंत ठेवण्याचं मोठं अद्वितीय आदात्त व ऊदात्त कार्य मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांनी केले. गेली अनेक वर्ष संभाजी ब्रिगेड ने सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात अनेक मान्यवर,  प्रमुख पाहुणे , सत्कारमुर्ती , ऊपस्थिती यांचा सत्कार सन्मान हा फुले पगडी देऊनच केला आहे. त्याच बरोबर पुस्तकांची भेट देण्याची पंरापरा देखील संभाजी ब्रिगेड नेच केली आहे.
           काल परवा खा. शरदचंद्रजी पवार यांनी फुले पगडी हीच कार्यक्रमात वापरली जावी असे वक्तव्य केले. मिडीयानो लगेच खलनायक ठरवण्यासाठी जमिन आस्मान एक करण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेब म्हणाले की कार्यक्रमात फुले पगडीच वापरावी. असे म्हणाले नाहीत की पुणेरी पगडी वापरु नका . तसंही वास्तविकता अशी आहे की ती पुणेरी पगडी नाही तर पेशवाईची पगडी आहे. खरं तर फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. फुले दाम्पत्यांनीच पहिली शाळा पुणेत सुरु केली. पुणेत मोठी क्रांती सुरु केली. म्हणुन फुले पगडी हिच पुणेरी पगडी आहे. पवार जे बोलतात ते विचारपुर्वकच बोलतात. त्यांच्या एका विधानावर जर मिडीयाला चर्चा करायला चोथा मिळत असेल तर पवार यांच्या विधानाची किमंत किती मोठी असु शकते याचा अंदाज लावला पाहिजे. जे फुले पगडी नाकारतात त्या शिवसेनेने एकच सांगावे की फुले पुण्याचेच अाहेत की मग पुणेरी पगडी नाकारण्याचा विषयच येत नाही. ऊलट यामुळे तुमचा ना'लायक पणा यातुन समोर दिसत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांना पुणे सोडण्याची धमकी ज्यांनी दिली त्यांचीच पेशवाई पगडी आज शिवसेनेच्या डोक्यावर आहे. याच्या मागे ब.मो. पुरंदरे सारख्या विकृत लेखकांचा हात नक्कीच आहे यात तीळमात्र काहीच शंका नाही.
      सदाशिवपेठेला पवारांच्या विधानाचा राग येणं स्वाभाविकच आहे. कारण त्यांच्याच बालेकिल्यात जाऊन पवार म्हणतात की फुले पगडी वापरा. कारण फुले पगडी ही क्रांतीच , प्रबोधनाचं प्रतिक आहे. अन्याच्या विरोधात जाऊन न्याय देणारा महान प्रबोधनकार व क्रांतीकारक म्हणजे महात्मा फुले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली शिवजंयत्ती , त्यांच्या चरित्रावर जगातला पहिला दिर्घ पोवाडा लेखन करुन गायला , रायगड पेशव्यांनी ऊध्वस्त केल्यानंतर वेली झुडपे काटे कुटे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसत नव्हती . त्या शिवसमाधीचा शोध घेऊन तेथे 19 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले यांनी जगातली पहिली शिवजयंत्ती साजरी केली. अशा महात्मा फुलेंच्या आदात्त व ऊदात्त कर्तृत्वाची प्रतिक असणारी फुले पगडी पेशवाईला म्हणजेच शिसेना व भाजप सरकारला का टोचते. मराछा साम्राज्याच्या विरोधात नेहमी काड्या करणाऱ्या पेशवाई पगडीचा एेवढा पुळका शिवसेनेला का आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाला जिवंत ठेवणाऱ्या महात्मा फुलेंच्या पगडीचा द्वेष म्हणजे मराठ्यांना व पराक्रमी दैदिप्यमान स्वराज्याच्या इतिहासाला विरोध करण्यासारखं आहे.    शिवाजी महाराजांचे नाव वापरायचे अन निवडणुका जिंकायच्या पण ज्या शिवाजी महाराजांना प्रकाशात महात्मा फुलेंनी आणले अशा महात्मा फुलेंचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या पगडीचा द्वेष करायचा ही पेशवाईची सदाशिव पेठेतील वाचाळ पुरंदरेची व घायाळ भिडेची विकृती म्हणावी लागेल. अशा विकृती आपल्या सन्मानाला बदनाम करण्यासाठी खलच्या थाराला जातात. याचं ऊदा. काल परवा मिडीयावर खा. पवार यांना खलनायक दाखवण्याची अागतिकता हे फार काही दाखवुन जाते.
           सर्व संघटना व पक्ष गट तट यांना विनंती आहे की फेटे तर आपण नेहमी बांधतोच पण येथुन पुढे फुले पगडी , सरदार पगडी , अशा क्रांतीच प्रतिक असणाऱ्या पगडी घालुनच सत्कार सन्मान सोहळे करावेत आणी पेशवाईच्या छाताडावर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात तसं थयाथया नाचावे. ..
                         *व्याख्याते हर्षल बागल य*
                       ( संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ते )
                              86 98 765 843

शनिवार, १५ जुलै, २०१७

वीर शिवा काशिद च्या रक्ताने पन्हाळ्याला अभिषेक घातला - हर्षल बागल

वीर शिवा काशिदच्या रक्ताने पन्हाळ्याची मातीला अभिषेक घातला. ....
                (व्याख्याते हर्षल बागल यांचा विशेष लेख)

जन्म शिवा काशिद म्हणुन झाला असला तरी मरताना मी शिवाजी म्हणुनच मरतोय .... हे माझं नशिब आहे. एकदाच काय पण स्वराज्यासाठी मी हजार वेळा शिवाजी म्हणुन मरायला तयार आहे,  सिध्दी जोहरच्या इनाम ला भिक न घालता स्वराज्य निष्ठेचं ईमान ठेवणारा वीर शिवा काशिद यांचा आज स्मृती दिन .... .. खऱ्या अर्थाने इतिहासाची पानं चाळायला सुरवात केली की पन्हाळा गड जो जोतिबा च्या समोरच मोठ्या थाटात निसर्गाच्या सानिध्यात आहे.  पन्हाळ्यावर शिवाजी महाराज सिध्दी जोहर च्या वेढ्यात अडकल्यावर शिवाजी महाराज सुखरुप विशाळगडावर पोहचावेत म्हणुन पन्हाळ्यावर प्रतिशिवाजी म्हणुन शिवरायांच्या वेश करुन मरणाच्या दारात जायला नेभापुरचा न्हावी शिवा काशिद म्या म्या म्हणत तयार झाला. .... राजं तुम्ही खुशालं जा विशाळगडावर मी नडतो आणी लढतो त्या सिध्दी जोहरबरोबर, शिवा काशिद शिवाजी महाराजांचा पोशाख घालतात आणी दरबारात येतात सर्वा जण झुकुन शिवाजी महाराज म्हणुन शिवा काशिदलाच मुजरा करतात त्याच पाठोपाठ लगेच शिवाजी महाराज येतात दरबारातील  पंत सरदार मावळ्यांना काहीच समजेना हुबेहुब दोन शिवाजी ....  महाराज मोठ्याने म्हणतात काय तुम्ही पण या शिवाजीला ओळखु शकलात नाही .... जर या स्वराजेयातले सरदार व मावळे जर शिवा काशिद ला ओळखु शकले नाहित तर  तो सिध्दी कसा ओळखेल .... ठरल्या प्रमाणे मोहिम आखली जाते. शिवाजी महाराज विशाळगडाकडे जाताना आपली गळ्यातली मोत्याचा हार शिवा काशिद च्या गळ्यात घालतात  ....  सिध्दीच्या वेढ्यातुन शिवाजी महाराज निसटुन जातात इकडे सिध्दीसमोर प्रतिशिवाजी म्हणुन शिवा काशिद असतो पण सिध्दी काय लवकर ओळखु शकला नाही. प्रतापगडाच्या लढाईत अफजल खान च्या मुलगा फाजल खान ह्याने शिवाजी महाराजांना पाहिलेलं होतं .... फाजल खान समोर येतो शिवाजी पाहुन म्हणतो कसा हुजुर हुजुर दगा हुआ है.... ये शिवाजी नही है... ये शिवाजी नही है... हम्हारे साथ दगा हुअा है.... सिध्दीच्या पायाखालची जमिन सरकते सिध्दी मोठ्याने ओरडतो म्हणतो क्या बकते हो ... हा हुजुर जब मेरे आब्बाजान को इस शिवाजीने मारा था तब ऊसी वक्त अाब्बाजान के वकिलसाब कृष्णा कुलकर्णी जीने इस शिवाजी के ऊपर तलवार से दो घाव किएे थे तब इनका ये राजेशाही जिरोटप नििचे जमीनपर गिरा था और इनके माथेपर थोडी चौट लगी थी ... ओ चोट नही है... सिध्दी चे होश ऊडतात तो सैनिकांना आदेश गेतो गिरफ्तार करदो साले को... हम्हे बेहकुफ बनाया शिवाजी ने ... अगर ये शिवाजी नही है तो ये कौन है. ... 
    अाणी शिवा काशिद गरजतो. .. " अरे बावळ्याने मी नेभापुरचा न्हावेयाचा शिवा काशिद हाय.... " आमचं शिवाजी राजं कधीच पोहचलं ठिकाण्यावर. ..  " अरं हे निसर्गाचं थैमान शिवाजी राजाला अडवु शकत नाही तिथं तु कोन लागुन गेला म्ाझ्या शिवाजी राजाला जेरबंद करायला गेलास. .. तुझ्यासारख्या सिध्दीला जर शिवाजी राजं पकडायचं असतील तर माझ्यासारखं हजार शिवा काशिद आडव येऊन नडुन आणी लढुन धारातिर्थी पडायला तयार हायतं..... या रयतेच्या स्वराज्यासाठी अामच्यासारखं हजार शिवाजी मरायला तयार हायतं लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ..... 
    " खामोश ...... सिध्दी जोरात शिवा काशिदच्या दिशेने ओरडतो. .. तुझे पत्ता है. ..यहा मौत के सिवा तेरे को कुछ नही मिलनेवाला फिर भी तु शिवाजी बन गया..... वर आसमानाकडे बघत सिध्दी म्हणतो कसा ...  अगर ये झुठा शिवाजी इस स्वराज्य के लिएे मरने के लिए तयार है तो सच्चा शिवाजी कैसा होगा .... किस मिठ्टी के बने है. ..ये मऱ्हाठे ... झुकाने से भि नही झुकते ये सिवा के मऱ्हाठे.... आणी रागाच्या आवेशाने लाल झालेला सिध्दी आपल्या तलवारीने शिवा काशिदवर सपा सपा वार करतो.... मरताना शेवटच्या अखेरच्या क्षणी देखील वीर शिवा काशिद म्हणतात... राजं जिवनाचं सार्थक झालं.... मरण मला शिवाजी महाराज म्हणुन आलंय..... मी हजार वेळा मरायला तयार आहे.... राज मुजरा घ्यावा...आणी वीर शिवा काशिद अखेरचा श्वास घेतात.... स्वराज्याची माती पुन्हा रक्ताने न्हाऊन निघाली...... 
तिकडे घोडखिंडीत बाजीराव बांदल आपल्या 300 बादलांच्या तुकडीने सिध्दीचं पाठलाग करणारं सैन्याशी लढत होते.  विशाळ गडावर शिवाजी महाराज पोहचल्यानंतर तोफांच्या बत्ती दिल्यानंतर अखेरचा श्वास बाजीराव बांदल यांनी सोडला... बाजीराव बांदल व तीनशे बांदल घराण्याची तुकडी लढाताना धारातिर्थी पडले.... घोडखिॆडीत रक्ताने अभिषेक घातल्याने घोडखिंड तेव्हापासुन पानखिंड झाली.... 
वीर शिवा काशिद व बाजीराव बांदल यांच्या सारख्या निष्ठावंत पराक्रमी मावळ्यांच्या रक्ताच्या जिवावर हे स्वराज्य ऊभा राहिले.... या मातिला आजच शिवा काशिद यांचा रक्ताने अभिषेक घातला अन हि मातीसुध्दा जुलमाच्या विरोधात रान पेटवुन गेली... 
                                      व्याख्याते हर्षल बागल 
                                        86 98 765 843

मंगळवार, ४ जुलै, २०१७

*महाराष्ट्राच्या राजकारणातील वारकरी- R R Patil- *हर्षल बागल*

*महाराष्ट्राच्या राजकारणातील वारकरी- R R Patil*
                   *हर्षल बागल*

     16 आँगस्ट 1957 ला याच महाराष्ट्राच्या धर्तीवर एक साधा पुढारी जन्माला आला.  जो जनमानसात मिसळणारा,  गोरगरिबांच्या घरात जाऊन हक्काने वाकळ अंथरुन त्यावर स्वताचं घर असं समजुन बसणारा , जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्र राज्य ऊपमुख्यमंत्री,  गृहमंत्री अशा मानाच्या पदावर जाऊन त्या पदाला योग्य तो न्याय देणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला कोहिनुर  म्हणजेच तासगावजवळील अंजनी गावचे आर आर आबा पाटिल.
     आज आषाढी एकादशीला वारकरी पाहिला अन आबांची आठवण आली,  श्री विठ्ठलावर जिवापाड प्रेम निर्वीवाद श्रध्दा ठेवणारे लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. पंढरीची वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सर्वांचे आर आर आबा. कारण त्यांचे विठ्ठलावर अपार प्रेम होते. आबा नेहमी पंढरपुरला आले की दर्शन घेतल्याशिवाय ते जात नसतं,  आबा राज्यात सत्तेत असताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर जाण्यासाठी अतिशय महत्वाचे निर्णय आबांनी महसुलाचा विचार न करता घेतले,  जर एखाद्या बाटली मुळे माझ्या महाराष्ट्रातील माऊलीच्या हातातील बांगडी फुॉत असेल तर अशा दारुतुन मिळणाऱ्या महसुलाची गरज या महाराष्ट्राला नाही,  हा महाराष्ट्र स्त्री ला देवघरातील दैवत मानतो या स्त्रीच्या कपाळावरील कुकं अाणी मनगटावरील बांगडी सुरक्षीत राहावी,  संसार ऊध्वस्त होऊ नयेत म्हणुन आबांनी पहिला धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे राज्यात दारुंबदी,   डान्सबार बंदी,  गुटखाबंदी,  यामुळे अनेक महिलांनी आबांना राखी बांधली आणी बगता बगता आबा लाखो महिलांचे भाऊराया झाले.
     तसेच आबांनी राज्यात गावागावातील परस्पर भांडणे मिटवावीत म्हणुन महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवले अाणी बघता बघता आबांच्या अभियनामुळे गावं च्या गावं तटांमुक्त झाली. लगेच आबांनी गावं स्वच्छ रहावी म्हणुन स्वच्छेतेचे दुत संत गाडगेबा स्वच्छता अभियान राबवले यामध्ये सुरवातीला आबांनी अशी झेप घेतली की महाराष्ट्राची स्वच्छता अभियान पाहण्यासाठी इतर राज्यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचा अभ्यास केला व इतर राज्यात देखील याचे धडे गिरवले जाऊ लागले. आर आर पाटिल यांच्या  आकस्मित निधनाचा झटका हा कोणत्या पक्षाला नव्हे , कोणत्या जातीला देखील नाही  तर महाराष्ट्राच्या निष्ककलंक वर्दीला आणी या मातीला बसला आहे. राजकारणातला विठ्टल समजला जाणारे शरद पवार सुधदा यांच्या निधनामुळे हतबल झाले होते. त्यांचा एक हातच निकामी झाला कारण आबा म्हणजे शरद पवारांची सावली होती हे विसरुन चालणार नाही.
       याच आबांनी पोलिस भर्तीला पारदर्शकता आणली,  अांबामुळे लाखो शेतकऱ्यांच्या पोरांच्या खांद्यावर महाराष्ट्र पोलिस हा बँच लागला,  चांगल्या परिवर्तनवादी संघटनांच खुलं समर्थन आबांनी नेहमीच केलं आहे. मराठा सेवा संघाच्या अथक प्रबोधनामुळे जातीय व धार्मीक दंगली कमी झाल्यात असा अावाहाल खुद्द आबांनीच केंद्राकडे पाठवला आहे. आबा म्हणजे सडेतोड व रोखठोक वक्ते होते. त्यांचा इतिहासाचा अभ्यास देखील होता. नेहमी आपल्या भाषणातुन सभामंध्ये ते इतिहासाचे दाखले देत असतं. खरं तर या नेतृत्वाला कोणताही राजकिय सामाजिक वारसा नव्हता कमवा व शिका या योजनेत महाविद्यालयात करुन कित्येक वर्ष एकच शर्ट इस्त्री करुन शाळा काँलेज करणारा हा संघर्ष योध्दा आपल्या पंढरीच्या मातीत म्हणजेच महाराष्ट्राच्या धर्तीवर जन्माला आलेला योध्दा ही सर्वसामान्य बाब नाही. , बापाच्या मृत्यु नंतर बापाची कपडे अलटर करुन घालणारा तसेच अनवानी पायाने काँलेज जिवनात विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करित भविष्याची खडतर वाट शोधणारं नेतृत्व आज आपल्यात नाही.  वारी आली की या संघर्ष योध्द्याची आठवण येणारच कारण याच आबांच्या कपाऴी विठ्ठलाचा टिका पाहिला की साक्षात महाराष्ट्राच्या राजकारणातला विठ्ठल गवसल्याचा सकारात्मक भास होतो.
      आबांनतर त्यांची पत्नी त्यांच्या दोन कन्या व ज्युनिअर आर आर यांच्याकडुन जनतेला खुप अपेक्षा आहेत. खरं तर आबांच्या संघर्षात त्यांचा विठ्ठल होता. पंढरपुर च्या वारीत सतत सहभागी होणारे,  महिलांच्या कुकंवाची काळजी मंत्रालयात बसुन घेणारा,  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या झोपडीत जाऊन त्याच्या बरोबर दोन घास सुखाचे खाणारा जाणता नेता पुन्हा या महाराष्ट्रात निर्माण करायचा असेल तर आबांच पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे,  आबांनी जनहिताच्या राबवलेल्या योजना टिकवल्या पाहिजेत,  संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चे नाव बदलुन या आक्रस्थाळी सरकारने नानासाहेब धर्माधिकारी असे नामांतर करण्याचा प्रयत्न सतत चालवला आहे.  स्वच्छता विभाग कधीच जाहिरातीमध्ये गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे असे नाव टाकत नाही स्वच्छ भारत असा ऊल्लेख करित आहे. आर आर पाटिल हे कडवे पुरोगामी होते म्हणुन तर त्यांनी गाडगेबाबांच नाव स्वच्छता अभियानाला दिले होते. अगदी त्यांनी आपला स्वताचा दहा व तेरावा घालु नये असं देखील लिहुन ठेवलं होतं यावरुन आबांचे विचार किती प्रगल्भ होते याची प्रचिती येते. आबांनी बंद केलेले डान्सबार या सरकारने पुन्हा चालु केले आहेत. किती दिवस माऊलीच्या हातातील बांगड्या डान्सबारमध्ये जाण्यासाठी मर्दानगी दाखवणारे फोडणार?  पोलिस प्रशासनात पुन्हा पारदर्शक आणायची आहे,  आबा गृहमंत्री असतानाचा क्राईमरेट पहा अन आत्ताचा नागपुरसह महाराष्ट्राचा क्राईम रेट पहा. ... पुन्हा एकदा गरज आहे ती धाडसी नेतृत्व करणाऱ्या आर आर आबांची पुन्हा गरज आहे ती डान्सबार,  दारुबंदी गुटखा बंदी,  करुन लाखो करोडोचां महसुल खड्यात घालुन स्त्रीचं मनगट व कपाळ सुरक्षीत ठेवणारा पुन्हा तगडा गृहमंत्री या महाराष्ट्राच्या मातीला नव्याने पाहिजे .... त्यासाठी तुमच्या आमच्यात अंजनी सारख्या गावातले आर आर आबांच्या विचाराची माणसं,  त्यांच्यासारखं कणखर जमिनीवर राहणारं नेतृत्व निर्माण करण्याची धमक ठेवली पाहिजे. तोच संघर्ष निर्माण करा पुन्हा महाराष्ट्राच्या विठ्टलाच्या वारीत आर आर पाटिल सारखा वारकरी पहायचा आहे. ...
          *(लेखक हे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते व पत्रकार देखील आहेत.)*

              मो.नं. - 86 98 765 843

                           

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

" वाचाळ भिडे - घायाळ पुरंदरे "
                     - हर्षल बागल
      बळवंत पुरंदरे तो झाकी है ...
       मनोहर भिडे तो बाकी है.....
असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तावर का आली? धर्मनिरपेक्ष  महाराष्ट्राच्या भुमीवर असे काय घडले कि सांगलीचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना वाचाळ... तर महाराष्ट्र भुषण सारखा ऊच्च पण आजच्या स्थितीला कचरा कुंडीची जागा असलेला पुरस्कार वशिल्यावर घेणारे बळंवत मोरेश्वर पुरंदरे घायाळ ....असे चित्र तयार झाले . ते त्याचंच अगावं डोकं चालवल्यामुळे. भिडेंनी बोलुन विक्रुती केली तर पुरंदरेंनी लिखानातुन छत्रपतींचा इतिहास विक्रुत केला. त्याच्यांच विचारसरणीचे सरकार असल्याने ते गुन्हेगार ठरत नसतील पण पुरोगामी महाराष्ट्रात ते डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या सविधानानुसार संबध शिवभक्तांचे आणि इतिहासाचे आरोपी आहेत.
          वाचाळ भिडे व घायाळ पुरंदरे हे महाराष्ट्राला व मावळ्यांच्या रक्ताने घडवलेल्या इतिहासाला दहशतवादी कसाब सारखेच घातक आहेत. एक वेळ कसाबपेक्षा जास्तच घातक म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही. कारण बंदुकीतुन सुटणारी एक गोळी ही एकाच व्यक्तीचा जीव घेते. तर वाचाळ भिडेंच्या व घायाळ पुरंदरेच्यां तोंडुन व लिखाणातुन बाहेर पडलेला जातीयवादी व समाजाला घातक असणारा तसेच दंगली घडवण्यासाठी पोषक विचार हा हजारो व्यक्तीच्यां साठी घातक असतो. ज्या प्रकारे सांगलीत भिंडेनी जोधा अकबर  मालिकेवरुन हिन्दूं मुस्लिम धर्मात दंगल घडवली होती . तर ती अनेक तरण्याबांड पोरांना घातक ठरली होती. अनेक हिंन्दू मुस्लिम पोरांना जेलची हवा खावी लागली , पण त्यात भिडेच्या जातीचं देशपांड्याचं , गोखल्याचं , जोश्याचं , कुलकर्ण्याचं पोरं जेलमध्ये गेलं नव्हतं. परत गणेशऊत्सवात अफजल खाणाच्या व शिवाजी महारांजाच्या पोस्टरवरुन मिरज सांगली पट्यातच जोरदार दंगल झाली. त्यातही एकही जाणंव घालणारं पोरं तरुंगात गेलं नाही . तरुंगात गेली तेल्याची, माळ्याची, महाराची,मागांची, मराठ्याची चांभाराची , कुंभाराची.....बहुजनांचीच पोरं प्रत्येकवेळी जेलमध्ये अाणी प्रशासनात यांची पोरं , वाचाळ भिडेंनी सांगली-मिरज भागातील तरुण पोरांना हिदूंत्व या शब्दाखाली भडकवुन रस्त्यावर आणले. भिडेने हि विक्रुती केली सगळ्या आपल्या वाचाळ वाणीने. राहिला विषय घायाळ पुरंदरे चा ,.....
        ज्या वेळेस सांगलीत पुरंदरेचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार रद्द व्हावा म्हणुन शिवसन्मान जागर परिषद अतिशय तुफान प्रतिसादात सुरू होती . या परिषदेला महाराष्ट्राचे मा. वै. मंत्री व आमदार डाँ. जितेंन्द्र आव्हाड , क्रांन्तीविरंगणा हौसक्का पाटिल , डाँ. स्मीता पाटिल , इतिहासाचार्य शेतकरीपुत्र  श्रीमंत कोकाटे, डाँ. प्रतिमा परदेशी ,  उपस्थित  होत्या . डाँ. आव्हाड बोलायला लागले . आव्हाडांमुळे व श्रीमंत कोकाटे सरामुंळे , चित्रलेखाचे संपादक न्यानेश महाराव सरांमुळे पुर्ण महाराष्ट्रात बळवंत पुरंदरेचा असली विक्रुत चेहरा समोर येत होता. निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला सांस्क्रुतीक दहशतवादी बळवंत पुरंदरे कसा आहे हे चागल्या प्रकारे माहित होत होते. महाराष्ट्र लेवल नव्हे तर राष्ट्रीय लेवलाही पुरंदरेला विरोध वाढत होता. तीव्र विरोध वाढत होता . पण पुरंदरे यांच्यावर होत असलेल्या आरोपाचे खंडण करायला घायाळ झालेले पुरंदरे स्वता पुढे कधीच आले नाहीत . घाय़ाळ पुरंदरेच्या मदतीला सांगलीचा वाचाळ भिडे आला. तो कसा ? याचे सविस्तर वर्णन सांगतो....
          डाँ. आव्हाड , कोकाटे सर , महाराव सर सगळीकडे खरं सांगतात ते काही सनातनी व प्रतिगामी चळवळीला बरं नव्हतं म्हणुन भिडेंनी सांगलीच्या शिवसन्मान परिषदेत गोंधळ घालुन आणला. तिथेही पुरानीच पध्दत वापरली ,  शिवाजी विरुध्द शिवाजी संघर्ष लावला. आव्हाड मागासवर्गीय आहेत त्यांना छत्रपतीवर बोलण्याचा काय अधिकार अशा वावड्या  उठवल्या . आणि परिषदेत काही तरुणांना गोंधळ घालायला पाठिवले. पण घडले उलटेच परिषदेतील आयोजकांनी व श्रोत्यांनी त्या गोंधळ घालायला येणाऱ्या पोरांचा गोंधळ घातला. बेदम मारला. पण भिडेला जे पाहिजे तेच घडले. याचा विचार आपण आपले डोकं आपल्या खांद्यावर ठेवुन कधीच केला नाही . वाचाळ भिडेने आपल्या जाणवं घालणाऱ्या घायाळ पुरंदरेच्या बचावासाठी मराठा विरुध्द मराठा म्हणजेच शिवाजी विरुध्द शिवाजी संघर्ष लावुन दिला . गोधंळ घालायला येणारीही पोरं मराठा बहुजन आणि त्यानां बेदम मारहाणा करुन जश्यास तसे ऊत्तर देणारे श्रोतेही मराठे बहुजनच होते. आपोआपच आपल्याआपल्यात संघर्ष झाला. त्यात कुलकर्ण्याचं , जोश्याचं , पुरंदरेचं , भिडेचं , गोखल्याचं , आपट्याचं एकही पोरं नव्हतं. मराठ्यानों आत्ततरी कळला का वाचाळ भिडे व घायाळ पुरंदरेचा ब्राम्हणी कावा ?
         बळवंत पुरंदरेवर महाराष्ट्रातुन एेवढी टिका झाली कि कधी सेनेने पाकिस्तानवर सुध्दा एेवढी टिका केली नाही तेवढी टिका महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी केली. पण निर्लज्जम सदा सुखी असणाऱ्या पुरंदरेंना त्याचं काहीच वाटलं नाही. लपुन छपुन का होईना पण पुरस्कार घेतलाच. एक हान्हा ..दोन हान्हा पण मला महाराष्ट्र भुषण म्हणा अशी गत घायाळ बळवंत पुरंदरेंची झाली.
        याच प्रकरणात सनातनी विचारसरणीच्या वाचाळ भिडेंचा वाचाळपण समोर आला . तो म्हणजे मी एकदा शिवसन्मान जागर परिषदेतुन घरी जात असताना एक धमकीची फोन आला त्यातील थोडा सवांद याठिकाणी देत आहे .
     " हँलो हर्षल बागल तुला काय कळंत का ? ...तु लय स्वताला शहाणा समजतो का ? .... तु कोण लय भारी हाय का ? आमच्या गुरूवर्य भिडे गुरजी व आमचे मार्गदर्शक आदरणीय पुरंदरे साहेब यांच्यावर कसलं पण लिखाण करतो कसही बोलतो काय तु लय शहाणा हाय का ? तुला कुर्डूवाडीत येऊन बघावं लागतं का ? तु कशाला आमचा नाद करतो....आणि त्या मागासवर्गीय आव्हाडला एेवंढ का डोक्यावर घेतो. ?
          मी या ठिकाणी मोजकाचं सवांद लिहीला आहे . त्यातील अश्लिल शिव्यागाळी लिहीण्यासारख्या नाहीत . म्हणजे बघा आपण खरं बोलायचं नाही , जितेंन्द्र आव्हाड मागासवर्गीय जातीने असतील पण विचारांने तर तेच खरे शिवरायांचे वंशज आहेत. मग आम्ही मराठे व मागासवर्गीय आव्हाड साहेबांमुळे एकत्र यायला लागलो.  मराठा -मागासवर्गीय याच्यांतील जातीय भाडणं बंद पडतील , ते एकत्र येतील व आपली दाळ शिजणार नाही,  या भितीपोटी जातीय विक्रुत व फालतु धमक्या द्यायला ही हे वाचाळ भिडे समर्थक मागे पडले नाहित....पण त्या धमकीला मी अतीशय विचारपुर्वक ऊत्तर दिले त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला . त्यांनतरं तो काँल रेकाँर्ड मी सोशल मिडीयावर टाकला सपुंर्ण महाराष्ट्र व अमेरिका , कँलिफोर्निया , जम्मू , आसाम , गुजरात , बिहार , मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मला फोन आले " हर्षल बागल तुम्ही त्या भिड्याला खुप छान ऊत्तर दिले " त्या आँडीयो काँल रेकाँर्ड मुळे वाचाळ भिडेचा अजुन खरा चेहरा ऊघड पडयाला मदत झाली , लोकांना कळायले लागले की भिडे वाचाळ कसा आहे. पण या पुरंदरे मात्र पुरतेच घायाळ झालते. व आजही घायळच आहेत . महाराष्ट्र भुषण जरी मिळाला तरी ते अजुनही छातीठोकपणे महाराष्ट्र भुषण प्राप्त मी आहे असं सांगु शकले नाहीत आणि तशी त्यांची हिम्मत होणार नाही. कारण ते पुर्णतहा ऊघडे पडलेत. कारण पुणे कोल्हापुर सोलापुर महानगर पालिकांनी त्याचां सत्कार करायला जाहिर विरोध करित प्रस्ताव आणला . तर राज्यातील अनेक नव्हे तर सत्तर टक्के ग्रामपंचायंतींनी पुरंदरे विरोधात प्रस्ताव मंजुर केले . माढा तालुका पंचायत समितीनेही रणजित भैया शिंदे , तुकारम ढवळे , शिलाताई रजपुत यांच्या पुढाकाराने विरोधाचा प्रस्ताव बहुमताने मंजुर केला . माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नितेश राणे यां पितापु्त्राने तर पुरंदरेच्या सत्काराला थेट खुले आवहाणच दिले . पिजऱ्यांत पुरस्कार दिला सत्कारही पिंजऱ्यातच करावा लागेल असा थेट इशारा दिल्यानंतर घायाळ झालेल्या पुंरदरेना अस्वस्थ वाटु लागले . आणी त्यांना झेड प्लस सेक्युरटी देण्यात आली . घराभोवती पोलिस पहारा देण्यात आला. पुरंदरे पुरते घायाळ झाले कारण पुर्ण महाराष्ट्ला नव्हे तर जगाला सत्य कळले होते कि पुरंदरेनी इतिहास लेखन करताना छ. शिवराय व राष्ट्रमाता जिजाऊ यांचा इतिहास बदनाम केला . हे खुद्द राजकारणातील ज्या व्यक्तीमत्वाला कोहिनुर म्हटलं जातं त्या शरद पवारांनीही मान्य केलं व पुरस्काराला विरोध केलता , छ.शिवरायंच्या दोन्ही वंशजांनीही विरोध केला . अनेक मोठमोठे साहित्यीक नेमाडे , पवार , सावंत , खेडेकर , कोत्तापल्ली  ब्रिगेडीयर सांवत , , रामदास आठवले , याच्यासह अनेक संस्था व संघटना यांनी रस्त्यावर ऊतरुऩ विरोध केला वैचारिक संघर्षातुन विरोध केला. पंढरपुरातील १८ जिगरबाज मावळ्यांना तरुंगात जावे लागले . पण ज्या  मावळ्यांनी रक्ताचा इतिहास घडवला तो मात्र पुंरदरेंनी मनुवादी लेखनीने पुसला व त्याच शिवद्रोही पुरंदरेला या मनुवादी प्रतीगामी सरकारने पुरस्कार चोरुन दिला आणि ऊलट पुरंदरेला घायाळ केले. हे शिवभक्तांना कळाले . तावडे,  मेटे , खडसे हे गद्दार मराठा  नेते निघाले , जयसिंगराव पवार , बलकवडे हे फितुर निघाले , राज ठाकरे व इतिहासातील जंत रामदास ठोसर याच्यात काडीचाही बदल नाही , रामदास हा आदिलशहाचा गुप्तहेर होता . हा ठाकरे प्रबोधनकारांच्या मुशीत व बाळासाहेबांच्या घरात जन्माला आला त्याला विरोध करुन भटुकड्यांची तळवी चाटण्यातच धन्यताा मानली . बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ साली पुरंदरेला विरोध केलता . हे या सैनिकांना कोण सांगणार , असो. ..........
   हर्षल बागल सारख्या लेखक व  वक्त्याचे वाचाळ भिडे गुरूजींना सवाल आहेत ?
जोधा अकबरला विरोध का केला ?
जोधा-अकबर चित्रपटाला विरोद करून सांगलीतील
वाचाळ भिडे याने हिंदूंच्या धर्म
भावना दुखावल्याचे ओरड सुरु करून
निवडनुकी पुरवी हिंदू-मुसलीम तणाव निर्माण
करण्याचा प्रयत्न केला .यामागे
मतपेटीचा हिशोबा होता.
२.धर्म भावनेचा विचार जर  वाचाळ भिडे करत असता तर
सांगलीच्या पटवर्धनाची भाग्यश्री व मुसलमान सलमान खान यांचा "मैने प्यार किया" हा चित्रपट चालू दिला नसता. नीट पहा ब्राम्हण   माधुरी दिक्षित, भाग्यश्री पटवर्धन, ऊर्मीला मातोडकर सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी , सई ताम्हणकर जेव्हा फक्त तोकड्या कपड्यावर बेड सिन देतात तेव्हा यांचा धर्म बुडत नाही का ?
   यानट्या हिरो म्हणून सलमान
खान, शहरूक खान, अमीर खान, सैफाली खान निवडतात तेव्हा या वाचाळ भिडे गुरुजीनचा विरोध का होत
नाही ?तिथे गळा भेट चालते वेळ प्रसंगी बेड सीन
हि चालतात ! मग जोधा अकबर लाच विरोध का ? भिडेला मराठ वाड्यातून का हाकलले ?  त्याला सांगलीतून तडीपार करण्याचा प्रस्ताव का आणला होता ?
एका भाषणात वाचाळ भिडे म्हणतो "छात्रपती गर्भात
असतानाच आतून मुसलमानानं
मारण्याच्या डरकाळ्या फोडत होते . तसेच
महाराज्जना मुसलमानाची प्रचंड चीड होती दररोज एक
मुसलमान मारल्या शिवाय महाराज आंघोळ हि करत
नव्हते !." आता मला सांगा शिवरायांचे खरे शत्रू
कोण ?
भिडे समर्थका नि माझ्या एका प्रश्नाचे उत्तर
द्यावे :---
१, निवडणूक जवळ आली कि सांगलीत दंगल
का होते ?
२. मग कारण काहीही असू देत १. अफजलखान कबर
२. जोधा अकबर ३.गणपती प्रदर्शनातील वाद ग्रस्त
पोस्टर.
मित्रानो..शिवप्रतिष्ठांन चे संस्थापक संभाजी भिड़े
यानी चालवलेली गड कोट मोहिम
सुरवातीला मोठ्या प्रतिसादात चालत
होती ..या मोहिमेत सध्याचे केन्द्रीय राज्य
मंत्री प्रतिक पाटिल माजी आमदार नितिन शिंदे..
या बरोबर अनेक प्रतिष्ठित डॉक्टर वकील
सहभागी असत... या प्रतिसादाचा उपयोग भिड़े
गुरुजीनी निवळ स्वार्थी पणासाठी, पोलीस अधिका-
यावरती वचक ठेवण्यासाठी केला कालांतराने ..शिवप्रतिष्ठांन
च्या सभासदाना सर्व समजत गेले जोधा अकबर
चीत्रपठाला केलेला विरोध निवळ दिखावा होता ...
सांगलीच्या पोलीस प्रमुखांनी मारहाण केली म्हणून
त्यांची बदली करा हि केलेली मागणी हि समस्त
सांगली कराना आवडलेली नव्हती... म्हणून
त्यांनी चालवलेल्या सर्व मोहिमा आता बंद
पडण्याच्या मार्गावर आहेत
शिवाजी राजांनी स्वत कोठे हिंदू
राजा किंवा हिंदवी राज्य असा उल्लेख केला आहे का ?
मुघल जनान्यात अनेक राजपूत
मुली असताना जोधा अकबर या सिनेमाला भिडे
वाचाळ भिडेंनी विरोध करून प्रसिध्द सोडून काय मिळवले ?
स्वत शिवाजी राजांनीही अकबराच्या धर्म
निरपेक्षतेची तारीफ केली आहे.
   या वाचाळ भिडेंनी महात्मा फुले विषयी जी गरळ ओकली आहे ती सनातन संस्थेनेही ओकली आहे. हे लोक महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात. ज्या माणसाने देश, समाज घडवला तो माणूस यांना देशद्रोही वाटतो. का तर यांच्यासामाजिक. धार्मिक वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. भिडे गुरुजी कडे बहुतांशी बहुजंनच असतात. आता ते बहुजन किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्या मनातमहात्मा फुल्यांविषयी आदराची, सन्मानाची भावना असते. तरी संभाजी भिडे त्यांना फुलेंचा द्वेष करायला शिकवतात. अशा गोष्टींना वेळीच रोखले पाहिजे.
लबाड लांडगं ढोंग करतंय...
-महाराष्ट्र सरकार याकडे का दुर्लक्ष करतेय.
सरकारला दंगली हव्या आहेत का..?
त्या वाचाळ भिडे नावाच्या उकिरड्याला वेळीच ठेचा नाहीतर ...
-जातीय दंगली अटळ आहेत...
      पण या वाचाळ भिडेपासुन व घायाळ झालेल्या पुंरदरे पासुन आपला समाज व आपला दैदिप्यमान व सर्वगुणसंपन्न इतिहास सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला सपुर्ण महाराष्ट्रभर मराठा विरोधक राज ठाकरेच्या तोंडावर टिचुन प्रबोधन करुन विचारांच तांडव निर्माण करावं लागेल . त्यासाठी सुरवातीला देलेल्या घोषणा ....
     पुरंदरे तो झाकी है ...
  भिडे अभी बाकी है.......
                     कायम लक्षात ठेवुनच पुरोगामी संघटनांना वाटचाल करावी लागणार  आहे . वैचारिक संघर्षाबरोबरच आपल्याला वेळ आली तर गद्यानेही लढावे लागणार आहे . अन्यथा तुमचा कधी दाभोळकर पानसरे हे करतील हे सांगताही येणार नाही . आरोपी सापडतीलही पण ते समिर गायकवाड सारखे सेफ व सुरक्षीत वाचवले जातील कारण मिडीया त्यांचा आहे , सरकार त्यांच आहे . प्रशासन त्यांच आहे , शासन त्यांच आहे कारण ते मनुचं भाषण आहे. पुरोगाम्यांनो या वाचाळ भिडेंपासुन व घायाळ पुरंदरेपासुन  एेवढं सावधानतेने काम करावे लागणार आहे असं मी नेहमी सांगत आलोय आणि आजही तेच सागणार ते म्हणजे रात्रच नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे .
    ( सुचना - देशहितार्थ व महाराष्ट्र इतिहासहितार्थ  लेखात काहीही बदल नकरता खाडाखोड न करता,  आवडला तर पुढे पाठवा आपले शिवकल्याण होईल )
               हर्षल बागल 
          लेखक व व्याख्याते
              (कुर्डूवाडी)
       वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
              प.महाराष्ट्र प्रवक्ते
"भुमीरत्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंता व चितंन " !
  ( आत्महत्या की व्यवस्थेने केलेली हत्या )
  " लढायला शिक बाबा आत्ता लढायला शिक
    मरायला नाही अत्ता कुणब्याच्या पोरा मारायला शिक "
           महाराष्ट्रातील वर्तमान काळाला  साद घालणाऱ्या जेष्ठ ग्रामिण कवी इंन्द्रजित भालेराव यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या . कारण आज ग्रामिण भागात शेतकऱ्यांची अवस्था काय आहे याचं शब्दात वर्णन करणं खुपच अवघड आहे. मराठवाडा -विदर्भ-खान्देश -प.महाराष्ट्र या भागात जगाचा पोशिंदा तुकोबाचा कुणबी दिवसाढवळ्या स्वताला संपवुन घेत आहे . कारण एकच आहे ते म्हणजे निसर्गाची बदललेली कालचक्रे.  कझी दुष्काळ तर कधी गारपीठ कधी अवकाळी पाऊस या बदललेल्या निसर्ग कालचक्रामुळे शेतकरी परता हैराण झाला व दुहेरी संकटात सापडला. एका बाजुने वाढती महागाई तर दुसऱ्या बाजुला पिक ऊत्पदनांची भावाची दैयनिय अवस्था . शेतकऱ्याला कधी कांदा भरपुर पदरात पडतो त्याच वेळेस येथील दलालांनी कांदा नासवला . कधी ऊस पदरात पडतो  त्याचवेळेस ऊसाचा भाव हा किरकोळ असतो . त्याचा वर्षभराचा खर्च ही निघत नाही. दुग्ध व्यावसाय करावा तर दुधाचेही भाव जमिन दोस्त झालेत. याचा परिणाम येथील शेतकऱ्यांच्या अार्थीक बजेटवर झाला .आणि घराघरात पैशाची चणचण भासु लागली . पिक पदरात पडेना . सकंटाच्या चौहू बाजुंनी शेतकरी वेढला गेला. आणी शेतकरी घरात विचार करत असतानाच त्याचा परिणाम त्यांच्या पोरांवर सहजरित्या झाला.  कुणब्याबरोबर त्याची पोरं-पोरी सुध्दा स्वताला बापाची हालत पाहावेना म्हणुन संपवुन घ्यायला लागली . ज्या महाराष्ट्रात एके काळी सोन्याचा धुर निघत होता त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सरणाचा धुर निघतोय. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? असा सवाल अत्ताच्या परिस्थितीला शोभुन दिसतोय .
      कारण ज्या हातांनी या काळ्या माईची मशागत केली , त्याच हातांनी येथील मुळ निवासी असणाऱ्या शेतकऱ्याला गळफास लावुन घ्यायची वेळ का आली ? याच्या मुळापर्यंत जाण गरजेचं असताना मात्र सरकारला गायीला वाचवण व बाईला नाचवंण महत्वाचं वाटतं म्हणुन गायीसाठी आंदोलनं करुन भडका केला जातो, तर बाईला डान्सबार मध्ये नाचवुन स्त्रीसत्ताक असणाऱ्या भारताची लक्तरं डिजीटल इंडिया समोर जगाच्या वेशीवर टांगली जात आहेत . आणि नेते म्हणतात की अच्छे दिन आने वाले है ? मगर कब आऩे वाले है ये मत पुछो अशी आवस्था हि सत्ताधाऱ्यांची झाली आहे . पण यांच्या खुर्चीच्या खेळात या जगाला तारणारा शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे . त्याचं काय ? त्यावर कुणीच काही बोलायला तयार नाही? भारताच्या प्रधानमंत्र्यांनी तर सत्तेवर आल्यापासुन परदेशात हजारो कोट्यांवधी रुपयांची खैरातच देण्याचा सपाटा लावला आहे. आफ्रिकन देशाला काल परवाच १० अब्ज डाँलर्स ची मदत जाहिर केली .आणी आफ्रिकेतील विद्यार्थ्यांना ५० हजार शिष्यव्रत्तीही जाहिर केली आहे . या धोरणाला काय म्हणावे , घरातल्या बायकोचं लूघडं कितीही फाटलं तरीही शेजारणीला नववारीच देणार अशी धारणा मोदींनी केली असावी . मोदीनीं शेतकऱ्यांना भारतात डिजीटल इंडियाची स्वप्ने दाखवत भाडंवलदर मोठा केला व शेतकरी -कष्टकरी वर्ग देशोधडीला लावला. भारतातील शेतकऱ्यांना मोदींनी काय मदत केली ? हा संशोधनाचा वेगळा विषय राहिला. ऊलट सरकारी दफ्तरी शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या याची नोंद लागु नये म्हनुन सरकारने सत्तेची चावी हातात येताच आत्महत्या करणे गुन्हा नाही हे कलम राज्य घटनेतुन काढले. त्यामुळे कुठेही कुणीही कितीही आत्महत्या केल्या तरी याची सरकारी दफ्तरी नोंद राहणार नाही.  शेतकऱ्य़ांनो तुम्ही कितीही आत्महत्या केल्या तरी त्याचा सरकारला काहीच ऊपयोग होणार नाही . कारण तुम्ही मेलात काय आणि जगलात काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. एका बाजुला शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दिवसेदिवस वाढत असतानाच , भाजप व  सत्तेत असणारी शिवसेना रोज गल्लीतल्या सार्वजणीक पाणवठ्यावर बाया भाडंतात तशी रोज एकमेंकानां भाडतात . फडणवीस साहेब तुमेही राज्याचे मंत्री आहात फक्त भाजप चे नाही. शिवसेना ही सत्तेत असतानाही गुंडगिरी करत आहे. औरंगाबादमध्ये सेनेचे खासदार तहसिलदार अधिकाऱ्यांच्या थोबाडीत मारुन शिव्यागाळी करतात. आर.टी.आय कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण करतात. हिच सेनेची संस्क्रुती असा सवाल जनसामान्य माणुस विचारत आहे. तर दुसऱ्या बाजुला मुख्यंमत्री शिवसेनेला धमकी देत म्हणतात तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करता तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय बांगड्या भरल्या नाहीत ? या ठिकाणी शिवसेना व भाजप च्या कार्यकर्त्यांनों एक गोष्ट लक्षात घ्या हे दोन्ही सत्तेत आहेत. आणि खाली सर्वसाधरण कार्यकर्त्याला एकमेकांची डोकी फोडायला प्रव्रुत्त केले जात आहे म्हणजे सेना -भाजप कार्यकर्त्यांची जरी भांडण लागली तरी त्या कोणताही शिवसेनेचा आमदार किवां मंत्री तसेच भाजपचा आमदार किवां मंत्री हे सोडा सरकारला रिमोट कंट्रोल ठेवणारे आर.एस.एस. मधील एकही जोशी कुलकर्णी त्या भांडणात मरणार नाही. मरणार सेनेतील व भाजपातीलच सर्वसाधरण कार्यकर्ता  . देशात महाराष्ट्रात चाललंय काय आणि यांची मात्र लहान पोरांगत भाडणं हे सत्ताधारी सरकारला शोभणारं नाही. नक्की शिवसेना सत्तेत आहे कि विरोधी बाकावर आहे हेच समजत नाही. राष्ट्रवादीनेही म्हणावा तसा आत्महत्याचा मुद्दा ऊचलुन सरकारला धारेवर धरले नाही. गेल्या दोन वर्षात ऊस ट्रँक्टरची टायरं फोडुन स्टंट करणारे शिट्या मारणारे राजाभाऊ ही दिसत नाहीत , या महाराष्ट्राचे मुख्यंमत्री फडणवीस साहेब कुठेच दिसत नाहीत . यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्ये पेक्षा नाचगाण्यावर खर्च करणं गरजेचं वाटतं . तर प्रधानमंत्र्यांना अजुन परदेश फिरुन फिरुन स्वदेश सापडलाच नाही .
       या महाराष्ट्राने देशाला सर्वोत्तम क्रुषीमंत्री दिला. पण आजच्या घडीला आजचे देशाचे क्रुषीमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यावर साधं चितंन सोडा पण चितां देखील दाखवली नाही. देशाचा क्रुषीमंत्री कोण आहे हे अजुन महाराष्ट्रातील सोडाच पण देशातील ८०% शेतकऱ्यांना माहित नाही . पहिल्यासारखी आत्ता बारामतीत आंदोलने होत नाहीत , प्रचारात डोळ्यातुन पाणी काढणारे सदाभाऊ खोत हरवले आहेत .
    कधी कुणब्याच्या घरात टोपल्यात भाकर नसल्याने कुणबिनीला आत्महत्या करावी वाटते तर कधी खाजगी सावकारी ला कंटाळुन तर कधी बँकांच्या तगाद्या ला कंटाळुन शेतकरी आत्महत्या करतोय . कधी शेतकऱ्यांच्या घरात सणासुदीला भाकरी थापायला पीठ नाही म्हणुन आत्महत्या करावी लागत आहे. तर कधी याच महाराष्ट्रात आँपरेशनसाठी पुरेसे पैसे नसल्याने शेतकऱ्यांच्या पोरीला हाँस्पीटल मघधुन बाहेर हाकलले जाते. तर कधी बापाकडे आपल्या शाळेच्या पासला द्यायला पैसे नसतात हि नेहमीचीच कटकट असल्याने बापाला व मोठ्या भावाला त्रास होऊ नये म्हणुन सोळा वर्षाची स्वाती नावाची मुलगी स्वताला संपवुन घेते. तर कधी एम.बी.ए. च्या विद्यार्थीनीला छेडछाडीला कंटाळुन स्वताला संपवावे का लागत आहे . समाज एेवढा असवेंदनशील झाला आहे का ? शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या श्रमकऱ्यांच्या भावना कोणत्या शंकराचार्याला का कधी समजल्या नाहीत. कुणब्याच्या घरातील दुख कोणत्याही एका गणेश मंडळाला किवां नवरात्र मंडळाला का दिसले नाही ? पैश्या अभावी कुणब्याची पोरं शिक्षण सोडुन भिकेला लागतात तेव्हा कोणत्याही पुजाऱ्याला -मौलवीला-फादरला -बुवा - बापु- महाराज- साधुला का दया येत नाही ?. यांना शेतकऱ्यांच्या  गोरगरिबांच्या शेतात कधीच पाण्याने दिवा एखाद्या साईला का पेटवावा वाटला नाही ? रस्त्याने भोगंळ फिरणाऱ्या मुनींना कधीच शेतकऱ्याची पाण्याअभावी ऊघडी भोगंळी पडलेली जमीन का दिसली नाही ? शेतकऱ्यांच्या - भुमीरत्नांच्या आत्महत्या होतात याला फक्त निसर्ग-पाऊस-गारपिठ-दुष्काळच जबाबदार आहे का ? तर माझा सारखा शेतकरीपुत्र एक भुमीरत्न हर्षल बागल माझं डोकं माझ्याचं खांद्यावर ठेवुन विचार करतो तेव्हा प्रामाणिकपणे ऊत्तर मिळते ते म्हणजे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येला जबाबदार निसर्गाबरोबर सरकारची चुकीची धोरणंही आहेत . आ.शरद पवार क्रुषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी क्रुषी प्लँन चालु करुन बी.एस.एन.एल या सीम कार्ड चा फायदा शेतकऱ्यांना करुन दिला . आजपर्यंत या क्रुषीप्लँन चा फायदा लाखोच्यावर शेतकऱ्यांना झाला . पण तो आत्ता होणार नाही . कारण या सरकारचे एक नाथ खडसे नावाचे मंत्री म्हणतात कि शेतकऱ्यांना मोबाईलचे बील भरायला पैसे आहेत पण एम.ई.सी.बी चे लाईट बील भरायला पैसे नाहीत . त्यांना मी एेवढंच सांगु इच्छुतो कि नाथ खडसे शेतकऱ्यांना मोबाईलचे बील जास्त येतच नव्हते कारण त्यांच्याकडे क्रुषीप्लँन होता पण तुम्ही सत्तेवर आलात आणि  तो क्रुषी  प्लँन तुम्ही कटकारस्थान करुन बंद करुन टाकायला लागलात याला सुडबुध्दीचं राजकारण म्हणायचं कि शेतकरी विरोधातले धोरण . तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या शेतीला व प्यायला सोडायला पाणी नसते पण तुमच्याकडे  नाशिकच्या नागड्या -ऊघड्या कुभंमेळाव्याला पाणी असते . भारताला क्रुषीप्रधान कसं म्हणायचं ते तुम्हीच सांगा .
    महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापेक्षा या २०१५ वर्षात आत्महत्त्येचे प्रमाण जास्त वाढले हा जरी आवहाल सांगत असला तरी मी या आवहालातीला शेतकऱ्यांच्या आत्महत्या केली याच्याशी मी सहमत नाही . कारण या मातीसाठी व मातीमध्ये कष्ट करणारा मुळ या जमिनीचा मालक जर याच मातीवर घाम गाळुन जगाला पोसित असेल, जगाची व एसी . रुम मधे बसणाऱ्या भारतातील इंडियाग्रेट म्हणणाऱ्यांची खळगी भरत असेल . आणी याच कष्टकऱ्या शेतकऱ्याला स्वताचं खळंग भरण्यासाठी जर जवळ भाकर नसल्याने आपल्याच बांधावरच्या वाळल्या लिबांच्या झाडाला हाडक्या झालेल्या बैलाच्या कासऱ्याने गळफास घेतो. तर हि आत्महत्या नसुन ही या निष्काळजी असणाऱ्या सरकारी व शासकीय व्यवस्थेने केलेला खुण आहे. हे मी हर्षल बागल एक शेतकरीपुत्र असल्याने येथील सरकारी व शासकीय व्यवस्थेवर बेधडक आरोप करित आहे.
" देशद्रोहाचा खटला माझ्यावरही भरतील
सचिन माळी सारखा मलाही आत टाकतील
नाहीतर खरे बोललो म्हणुन हर्षलचा पानसरे करतील "
  एेवढंच होईल याच्या पलीकडे जास्त काय होईल .? पण आत्ता नाही आम्ही मरणार नाही आम्ही मारणार , आम्ही आत्ता रडणार नाही .आम्ही आत्ता लढणार आणी येथील शेतकऱ्याच्यां -कष्टकऱ्यांच्या -श्रमकऱ्यांच्या हक्कासाठी यांच्या न्यायासाठी  , सन्मानासाठी आम्ही मैदानात ऊतरलो आहे. आत्ता हा लेखण प्रपंच वाचल्यानंतर अनेक दुतोंडी भट्टाळलेले म्हणतील कि या शेतकऱ्यांना सन्मानाची जाणीव भाजप सरकार सत्तेवर असताणाच कशी काय झाली . याचं ही ऊत्तर आहे . कारण शेतीची मशागत करताना ज्या कुळवाच्या रुमण्याला धरुन धरुन तळहाताला घट्टे पडलेत , त्याच तळहाताला आत्ता लेखणीचा स्पर्श झाला आहे . आणि शेतकऱ्यांची पोरं लीहायला व वाचायला लागली व प्रामुख्याने या निष्क्रिय व्यवस्थेवर विचार करायला लागली . पण आमची शेतकऱ्यांची पोरं शीकतील व पुढे जातील , नोकऱ्या करतील म्हणुन या व्यवस्थेने येथील कष्टकरी वर्गाला धार्मीक गुलामीत टाकायला चालु केले . शेतकऱ्यांसमोर अंधश्रध्दा  पसरवायला सुरवात केली . आमचा न शिकलेला शेतकरी अपेक्षेपोटी अनपेक्षीत पणे या धार्मीक गुलामगिरीत आडकला . आसाराम-रामपाल- रामदास- अशा थोतांडाच्या नादी लागुन बरबाद होत गेला . देव-धर्म- व व्रत वैकल्य ऊपास-तपास या अंधश्रध्देत फसला . नवसाला बळी पडला. याला कारण म्हणजे शिक्षण ? शिक्षण नसल्याने अनेक शेतकरी कुटूंबात आजही गावागावात व्यसनाधिनता आहे. कष्ट करणारा दारुच्या नषेत पिऊन येऊन संसाराची होळी करतानाचे वास्तव चित्र आहे. सगळेच त्यातले नाहीत पण जे नाहीत त्यांनी जे आहेत त्यांना या गाळातुन वर काढलं पाहिजे . सरकारनेही अनेक दुकानं सरकारमान्य केली पण अनेक शाळा अमान्य केल्या . आज गावागावातलं वास्तव आहे कि अनेक मंदिरं हे सुसज्ज आहेत . मंदिरात पाँलिशची फरशी आहे . पण ज्या झेड.पी. च्या शाळेत शेतकऱ्याचं पोरं शिकतो त्या शाळेची अवस्था मात्र पडक्या वाड्यासारखी असते. शाळेवर धड पत्रेसुध्दा गळके असतात. एक मंदिर एकाच पुजाऱ्याचं पोट भरते तर शाळा ही हजारो शेतकऱ्यांच्या पोरांच कल्याण करते. मग सरकारणे सुध्दा मंदिराएेवजी शाळा सुसज्ज करणं माझं वैयक्तिक मत वाटतं . यामुळे शेतकऱ्यांची पोरं शाळा शीकतील व मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतील . कुणी क्रुषी डिग्री करुन शेतीच नवीन टेक्निक ने करेल अशा अँग्रिकल्चर काँलेजसला सरकारने जास्त महत्व दिले पाहिजे . शेतकऱ्यांच्या घरात शिक्षण गेल्याशिवाय त्यांच्या मनातील नैराश्य दुर होणे कठिण आहे . शेतकरी पुत्र शिकला तर घर सुक्षिक्षित होण्यास वेळ लागणार नाही.
      सरकारने व प्रशासनाने आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने शेतकऱ्यांना जे बी. बीयाणे खते, लागते ते कमी किमतीत नव्हे तर ते एकरी मोफतच ऊपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अनुदान -पीक विमा, गारपिठ, दुष्काळ निधी न देता थेट क्रुषी अवजारे शेतीच्या बांधावर ऊपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या होतात ते थांबवणे हे फक्त सरकार चे काम नसुन येथील कारखाणदार यांचे ही काम आहे . काही कारखाणदार येथील ऊस सभासदांना साखर देतात ती सुध्दा मोफतच देणे गरजेचे आहे. सरकारनेही शेतकऱ्यांच्या फक्त उसालाच नव्हे तर सर्वच पिक-धान्यांणा योग्य तो भाव दिला पाहिजे .
        तसेच मी हा लेखण प्रपंच करताना एक शहरातील व बड्या बापाच्या टपोर औलांदीना नक्कीच सांगेन कि आपला वाढदिवसावर हाजारो रुपएे खर्च करण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला शैक्षणिक मदत करा. नेता व पुढारी असल्याचा आव आणणाऱ्या आपल्या वाढदिवसाला लाखोरुपएे जहरातबाजी व डिजीटलवर खर्च करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरात धान्यांची पोती व बासमती तांदुळाची पोती टाकली तर त्यांचा दुआ मात्र नक्कीच मिळेल .  आपल्या मेकअपवर हाजारो रुपएे खर्च करण्यापेक्षा गरिबाच्या झोपडीतील एखाद्या विद्यार्थीनीला शाळेसाठी मदत करा. बड्या ऊद्योगपतींनीसुध्दा आपल्या रोजच्या हाँटेलमधील ताटली-बाटलीसाठी रोज हजारो रुपएे खर्च करता त्याएेवजी शेतकऱ्याच्या घरात एखाद्या बहिणीसारख्या कुणबीणिला साडीचोळी घालुन त्या माऊलीचाही कधीतरी सन्मान करा. पब मध्ये व डान्स बारमध्ये बसुन नोटांचा पाऊस पाडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांवर शिक्षण व चांगल्या सकारात्मक विचारांचा पाऊस पाडा. गावागावात जाऊन  प्रबोधन करा , देव-धर्म-व्रत वैकल्य-ऊपास-तपास अशा फालतु गोष्टीपासुन शेतकऱ्याला लांब ठेवा त्यासाठी गावागावात प्रबोधन करा. आठवढ्याला  मंदिरात दान करण्याएेवजी महिन्याला शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्या-श्रमकऱ्यांच्या पोरांचे बस चे पास काढुन द्या . त्यामुळे परत कोणतीही सोळा वर्षाची स्वाती सारखी संवेदनशील विद्यार्थीनी बस च्या पास साठी पैसे नाहीत म्हणुन आत्महत्या करणार नाही. तरुण पोरांनी डी.जे च्या तालावर नाचण्या एेवजी पुस्तक वाचण्याची संस्क्रुती गावागावात रुजवली पाहिजे . सगळ्यात महत्वाचे मिडीयाने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वैचारिक पेरणी निर्माण करणं गरजेचं आहे . या आवस्थेला मिडीया सुध्दा कारणीभुत आहे. हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येवरील चितंन आहे.
       शेतकरी वाचला तर देश वाचेल अऩ्यथा या देशात येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांची पोरं नक्षली झाल्याशीवाय राहणार नाहीत . हे असेच चित्रण राहिले तर ज्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात कुळवाचे रुमणे आहे त्याच हातात नकळत बंदुका येतील आणि मग मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल . शहरात बसुन मातोश्रीवरुन फक्त शेतकरी होता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर ऊतरावे लागते. बंगल्यात बसुन चहातली साखर गोड लागतेच . पण त्या साखरेचा निर्माता गावाकंड कोणत्या परिस्थीत जगतोय त्यासाठी गावाकंड चला आणी शेतकऱ्यांना संपण्याआधीच वाचवा त्यासाठी ओरडु ओरडु कवी इंद्रजीत भालेराव सरांच्या भाषेत सांगायचे झाले तर.
    "    इथं डब्यात तुला  साखर लागते गोड
          तिथं शेतात बापाच्या अंगाला फोडं
          इथं डब्यात तुला साखर लागते गोड
          तिथं शेतात बापाच्या अंगाला फोडं
पण भाव ठरतो त्याला न पुसता
गावाकडं चल माझ्या दोस्ता
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
गावाकडं चल माझ्या दोस्ता......."
(सुचना - या लेखात कोणताही बदल नकरता हा लेख आवडला- मनाला पटला तर  आहे तसाच पुढे पाठवावा हि भुमीपुत्राची विनंती -)
लेखक
व्याख्याते हर्षल बागल
(राजकिय व सामाजिक विष्लेषक )
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
प.महाराष्ट्र प्रवक्ते
मो.नंबर.- 97 63 932 999

बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५

शहिद-ए-आजम वीर भगतसिंग ..!

शहिद-ए-आजम वीर भगतसिंग ..! 

  (२८ सप्टेंबर जयंत्ती विशेष) harshal bagal

   
       ज्याने कधीच  हात जोडले नाहीत,  पण आज सारा भारत त्याच्यां पुढे नतमस्तक होतोय ते बुलंद व्यक्तीमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर शहिद एे-आजम वीर  भगतसिंग याचां आज जन्म दिवस त्यानिमीत्ताने हा मांडलेला लेखन प्रपंच , वीर भगतसिंग यांचा  जन्म : सप्टेंबर 28, १९०७ - रोजी झाला तर  मृत्यू : मार्च २३, १९३१ रोजी झाला. वीर भगतसिंग देशासाठी ज्या वयात हसत हसत फासावर गेले , ते वय म्हणजे पोरा-ठोरांनी हसत खेळत काँलेज लाईफ एेन्जाँय करण्याचं वय , पण हा देशप्रेमी आपल्या याच वयात देशासाठी आपले प्राण कुर्बाण करुन वयाच्या साडे तेवीसव्या वर्षी फासावर जातोय , यालाच म्हणतात देशभक्ती , राष्ट्रभक्ती .
    परुंतू आज शहिद भगतसिंगाचा आदर्श खरच घेण्याची गरज युवा -तरुण वर्गाला क पडतेय , त्याचं एकमेव कारण म्हणजे आजचा युवा -तरुण  भरकटला आहे , मुख्य ऊद्दीष्टांपासुन तो दिशाहिन झाला आहे म्हनुन ज्या वयात घडायचे असते त्याच वयात आपली पोरं बिघडायला लागली , यचं कारण म्हणजे आपण डि.जे. तालावर नाचयला लागलो , आणि पुस्तकं वाचनं विसरायला लागलो. धार्मीक ऊत्सवात या देशातला तरुण बरबटला जाऊ लागला. नको त्या फालतु गोष्टीमंध्ये तरुणांचा वेळ चालला, म्हणुन आज वीर भगतसिंग यांच्या नितीमुल्यांची गरज आजच्या भारतीय तरुणाला आहे . सगळेच तरुण दिशाहिन नसतात . ते चांगले विद्रोही उपक्रम राबवतात पण समाज त्यांना नावे ठेवत असतो . त्यासाठी ७० वर्षापुर्वीच वीर भगतसिंग अशा लोकांसाठी म्हणतात कि,
   "ज्यांना वाट चुकलेली पोरे म्हणतात, तीच पोरे क्रांती करतात...."
आपल्याला जर तरुण वर्ग सुक्षिशित व यशस्वी करायचा असेल आपल्याला वीर भगतसिंग यांचा पराक्रमी व ज्वाजल्य इतिहास विसरुन चालणार नाही . प्रत्येक भारतीयाच्या मनात शहीद वीर भगतसिंगाचे विचार रुजवले पाहिजेत , वीर भगतसिंग हे नास्तीक होते , त्यानां देव हि संकल्पन मान्य नव्हती , ते म्हणतात कि , ज्याचा स्वताच्या मनगटावर विश्वास नसतो तोच देवाचा जप करतो . फाशीवर चढवताना एक सरदार भगतसिंगाना म्हणतो.माझ्याजवळ धर्मग्रथ आहे.
आता तरी काहीतरी वाच.
त्यावर भगतसिंग म्हणाले.
"आज,यावेळी जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल.मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही, ती मी आज केली तर तो म्हणेल की हा भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण आजवर मी तसा जगलो आहे.माझ्यावर कुणी असा आरोप करणार नाही की जन्मभर मी नास्तिक राहिलो पण अखेरच्या वेळी भितीपोटी आस्तिक झालो"
या देशातील तरूणांनी शहीदे आजम भगतसिंह यांचा आदर्श घ्यावा
बाबासाहेबांचे विचार घ्यावेत
सत्यशोधक महात्मा फुलेंचा विद्रोह घ्यावा
राजर्षि शाहू महाराज व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची सर्वसमावेशकता घ्यावी
शंभूराजेंचा बाणेदारपणा व  करारीपणा घ्यावा
शिवरायांचा स्वातंत्र्यवादी आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोण घ्यावा.भारताचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे. फक्त आपण जगाबरोबर बदलले पाहिजे . पण बदलत असताना आपण आपल्या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या शहिदांना मात्र विसरले नाही पाहिजे . नाही तर परत मलाच म्हणावे लागेल कि ,
"हंसते हंसते जो फॉंसी वाले तक्तोंपर झूल गए,हमे हनीसिंग पता है पर भगतसिंग को भूल गए."
मित्रानों तुम्हीच तुमचं डोकं स्वताच्याच खांद्यावर ठेवुन विचार करा , देशाला भगतसिंगानी वाहुन घेतले ते फक्त जीव देऊन नव्हे तर त्याचां विचार काय सांगतो , हे देखिल तपासणे गरजेचे वाटते . देशाला फक्त इंग्रजांपासुन मुक्त करणे हा त्याचां ऊद्देश नव्हता तर या देशातील प्रत्येक नागरिकाला , शिक्षण मिळाले पाहिजे , येथील विषमता नष्ट होऊन येथे समता ,बंधुता निर्माण झाली पाहिजे , ते नेहमी म्हणायचे कि इंग्रज (गोरे)जातील पण परत आपलेच काळे आपल्याच गरिबांच्या ऊरावर बसतील , त्यासाठी येथील गरिब व श्रीमंत हि भिंत नाहिसी झाली पाहिजे या मताचे वीर भगतसिंग होते . असा विचार करणाऱ्या व भगतसिंग यांच्या विचारावर चालणाऱ्या आज देशात किती संघटना पाहायला मिळतात . फक्त त्यांच्या पुण्यतिथीला व जयंत्तीला आठवुन काढुन चालणार नाही , तर त्यासाठी त्यांच्या नास्तीक व पुरोगामी , तसेच देशाला भविष्याच्या बाजुने घेवुन जाणाऱ्या विर भगतसिंग विद्यार्थी परिषद सारख्या क्रांन्तीकारी संघटनांची नितांन्त गरज आहे . म्हनुन आपल्या आपले ऊद्दीष्ट हे मोठे ठेवण्याची गरज आहे . भगतसिंग म्हणतात "उद्दिष्टासाठी मरणे नव्हे, तर उद्दिष्टासाठी जगने आणि ते देखील लाभदायक होईल अशा योग्य पध्दतीने जगने, हा सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्श असायला हवा." मग आमचा आदर्श हनीसिंग ठेवायचा कि भगतसिंग पाहिजे . हे मात्र आपल्या हातात आहे .
     वीर भगतसिंग यांच्या जिवणाविषयी थोड्या जाणुन घेवुयात . स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या हिरीरीने भाग घेणारे सरदार अर्जूनसिंग यांची तिन्ही मुले स्वातंत्र्यलढ्यात उतरली. किशनसिंग, सरदार अजितसिंग सरदार स्वर्णसिंह असा उज्वल वारसा असलेल्या घराण्यात, सरदार किशनसिंग आणि विद्यावती देवी यांच्या पोटी सरदार भगतसिंह यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले.
भगतसिंगांच्या अंगात लहानपणापासूनच स्वातंत्र्याचे वारे होते. लहानपणी शेतात बंदुकीची झाडे लावून त्यांना बंदुकी उगवण्याचा खेळ ते खेळत असत. लहान वयातच त्यांनी अनेक क्रांतिलढ्याची पुस्तके वाचून काढली. नवव्या इयत्तेत असताना त्यांनी विदेशी कापडाच्या होळ्या पेटवल्या. जालियनवाला बागेचे हत्याकांड त्यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते.
लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंब्लित बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. 
नंतरच्या काळात मात्र त्यांच्या फाशीमुळे भारतात सर्वत्र क्रांन्तीचे वारे वेगाने वाढले . ज्यावेळेस भगतसिंग यांना इग्रंज न्यायालयाने फाशी सुनावली . गांधी व व्हाईसराय यांच्यात फाशीवर चर्चा झाली... इतिहासात गांधीनी भगतसिंग यांच्या फाशीला विरोध केला असा कुठेही ऊल्लेख व पुरावा देखील मिळत नाही . नाहीच तर कसा मिळणार. ऊलट भगतसिंग यांचे वडिल किशनसिंग याच्या कानावर असे आले कि ..." गांधी व्हाईसराय यांना म्हणतात..जर या तीन तरुणांना म्हणजे भगतसिंग, राजगुरू , सुखदेव यानां जर फाशी द्यायची असेल तर ...मार्च मध्ये होणार्या कराचीमधील काँग्रेस अधिवेशनापुर्वी व्हावी .." असे गांधी व्हाईसरायला म्हणतात...याचं एक कारण म्हणजे ....गाधींना भगतसिंगच्या वाढत्या लोकप्रियतेचा मनात राग होता किवां इंग्रजासमोर " द रियल हिरो " म्हनुण भगतसिंग ओळखले जाऊ लागले....
हे गांधीच राजकारण , तत्वे कि अजुन काय हा तेव्हा पासुन संशोधनाचा विषय आहे...
   भगतसिंगाना फाशी दिल्यानंतर देशात क्रांतीची लाट मोठ्या प्रमाणात वाढली इग्रंज सरकारविरोधात रयत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऊतरली ...
गांधीना लोकांनी भगतसिंग याच्या फाशीबद्दल जाब विचारला ...पन गांधीनी या फाशीला मुखसंमती दिली होती असेच म्हणावे लागेल....
बलिदानानंतर भगतसिंग यांची प्रतिमा उलटलअजुनच उजळली होती ....वाऱ्यासाऱखी  बातमी पुर्ण भारतात पसरली...आणि काही दिवसातच इग्रंजाना देश सोडावा लागला ...
मग माझ्यासारख्या हर्षल बागल  ला प्रश्न पडतो कि व्यक्तिपुजा होणार्या देशात आजच्या घडीला या थोर क्रांतीकारकाची जागा कुठाय .....गांधीची पुजा प्रत्येक शाळेत करता पन भगतसिंगाच काय....?.
अवघ्या २३ वर्षाच्या वयोमानात या तरुनांचा आदर्श हा घरात भितींवर सोनेरी अक्षरानी लिहुन ठेवावा असा आहे...पन भगतसिंगाना जागा दिली ना ती पन कुठे सरकारी कचेरीत भितींवर ...ती सुध्दा ज्या गांधीनी जिंदगीभर भगतसिंगाना विरोध केला ..त्या गांधी शेजारीच ना ...
अरे भगतसिंग असा एकमेव क्रातींकारक होता कि परकियांना भगतसिगच्या मेलेल्या प्रेताची सुद्धा भिती वाटत होती .....अरे इथे तर जिवंत पणी कोन कुनाला खात नाही पण ...भगतसिंगाना मात्र फाशी दिल्यावर सुध्दा इंग्रज सरकार भित होते . देशभरात जे क्रांतीचे आंदोलन सुरू केले आहे , त्याची प्रेरणा हि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केलेल्या स्वराज्यापासुन घेतली असे वीर भगतसिंग म्हणतात , असा ऊल्लेख राष्ट्रीय स्मारक ग्रंथात आढळतो . मग मित्रांनो आपण तर वीरांच्या , शुरांच्या, व संताच्या  भुमित जन्माला आलो आहे . आपण तर विचाराने बेभान व्होवुन पेटले पाहिजे.
मित्रानो हा लेख लिहण्यामागे एकच उद्देश कि या तरुन क्रांतीकारक भगतसिंगचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपन सर्वानी राजसत्ता , धर्मसत्ता , अर्थसत्ता , शिक्षणसत्ता , व प्रसार व प्रचार माध्यम सत्ता, पाच सत्तेत तरुण युवा वर्गाने आपले वर्चस्व निर्माण केल्यास हा साठ कोटी तरुण मुंडक्याचां भारत देश विचाराने सुध्दा तरुण होईल यात काही शंकाच नाही . जाताजाता वेगळ्या शब्दात सांगतो...
वीर भगतसिंगांचा बाणेदारपणा व स्वातंत्र्यवादी आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोण घ्यावा.
अशा या शहिद वीराला आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने  त्यांच्या शौर्याला ,त्याच्यां कार्याला ,त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो .
देश मे भगतसिंग से बढकर
ना कोई दुजा है ,
हमने एेरे गैरे को नही
वीर भगतसिंग को पुजा है .....!
       
     व्याख्याते व लेखक
     पत्रकार  हर्षल बागल
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
      प.महारष्ट्र प्रवक्ते

शुक्रवार, १९ जून, २०१५

काल
रात्री ११:३० वाजता माझा फोन वाजला पाहतो तर काय मोहोळच्या मित्राचा होता. म्हणाला बायकोच्या आईला साप चावलाय  आम्ही त्यानां घेऊन सिव्हील ला सोलापुर ला आलोय . पण कागदपत्रे नसल्याने डाँक्टरानी उपचार करण्यास नकार दिला ..पिवळे रेशन कार्ड आणा मगच उपचार करतो असा तगादा लावला .....मग काय मित्राने माझा 9763932999 नंबर डायल केला .....मी त्या डाँक्टरांना समजुन सागतोय पण तो डाँक्टर व लेडीज कंपाऊडर एैकायलाच तयार नाही .मग मी डाँक्टर ..कंपाऊडर ,  यासह सगऴ्या कर्मचारीनां विद्रोही पत्रकारितेचा  व संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचा हिसका दाखवत सांगीतले  ..." तुम्ही कागदपत्रे नसल्याने उपचार करू शकत नाही " हे मला " लेखी " लिहुन द्या नाही तर .पेशंट ला काय झाले तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहचाल . मग लोकमतच नव्हे प्रत्येक वर्तमान पत्रात पहिल्या पानावर तुमच्यावर लिखाण करावे लागेल....आणि या संघटना सिव्हील मध्ये तर घुसतीलच त्याचबरोबर संबधीत डाँ. व कर्मचारी यांच्या घरी ही घुसतील तुम्ही ठरवा काय करायचे मला पेशंटला वाचलेले पाहयचे आहे . हे बोलल्यावर ..ते माफी मागुन उपचाराला लागले ...आणि मित्राच्या बायकोच्या आईचे प्राण वाचले ...
वास्तवीक नियम सांगतो कि कागदपत्रे असो किंवा नसो पेंशट वर उपचार करणे प्राथमीक कर्तव्य आहे ...चावा घेणारा साप खुपच विषारी होता ..पण सत्यासाठी, न्यायासाठी  आणि गरिबासाठी लढणारा हा विद्रोही हर्षल बागल त्या सापा पेक्षाही विषारी आहे .  नियम तोडणारा डाँक्टर असो पोलिस कि गुंडा तो माझ्यापुढे आरोपीच असेल ...त्याला माफी नाही ... यावेळी लोकमतचे आमचे मार्गदर्शक शिवाजी सुरवसे , रेवणसिध्द जवळेकर यांची मदत मिळाली त्यांचेही जाहिर आभार ..तसेच
आज माझ्या आक्रमक स्वभावामुळे व विद्रोही बाण्यामुळे  मित्राच्या बायकोच्या आईचे प्राण वाचले ....हे पुण्य मला मिळाले ...याचं समाधान आहे ...

       विद्रोहीहर्षल बागल
       पत्रकार व व्याख्याते
         97 63 932 999